डोंबिवली – हद्दपार गुन्हेगारास टिळक नगर पोलिसांनी अटक केली आहे. आतिश राजु गुंजाळ असे याचे नाव आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर टिळक नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस गुन्हेगार वॉच व प्रतिबंधक कारवाईकामी पेट्रोलिंग करीत असताना हद्दपार गुन्हेगार आतिश गुंजाळ हा शेलार नाका परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन आतिश गुंजाळला अटक केली.

सदरची यशस्वी कामगिरी व.पो.नि. दत्तात्रय बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहा.पो.निरी.जगन्नाथ शिंदे, सहा.पो.उपनिरी.श्याम सोनवणे, पो.ह. भूषण पवार, पोकाॅ. अजित राजपूत, पो.काॅ. संदीप सपकाळे यांनी केली.