मुंब्र्यातील डॉक्टरच्या हत्येचा अखेर उलगडा, रिक्षाचालक… 

Published:

ठाणे – मुंब्र्यातील एका ६२ वर्षीय डॉक्टरच्या हत्येचा उलगडा करण्यात शिळ-डायघर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका रिक्षाचालकाला अटक केली आहे. वसीम सत्तार मेमन असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. तर डॉ.सिराज अहमद मंजुर अहमद खान असे या डॉक्टरचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, डॉ.सिराज यांनी वसीमकडे गाडीचा टॅक्स भरण्यासाठी पैसे दिले होते. परंतू वसीम टॅक्स भरण्यास व घेतलेले पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यावरुन डॉ.सिराज हे वासिमला वारंवार फोन करुन विचारणा करीत होते. तसेच त्याच्यांत या गोष्टीवरुन भांडणही झाले होते. त्या भांडणाचा राग मनात धरून, वसीमने डॉ.सिराज यांना रिक्षातून फडके पाडा येथे नेले आणि त्यांची हत्या केली.

दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल करून तात्काळ तपास करून वसीम मेमनला अटक केली. 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page