डोंबिवलीत अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने संबंध; गुन्हा दाखल…

Published:

डोंबिवली – एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी एका तरुणावर राम नगर पोलीस ठाण्यात भादंवि ३७६(२)(I) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर सदर प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिमांशु बामणे असे या तरुणाचे नाव आहे.

हि मुलगी इयत्ता १० वी त शिकत असून, या मुलाने तिच्याशी ओळख वाढवून त्यानंतर माझे तुझ्यावर प्रेम आहे, मला तुझ्यासोबत लग्न करायचे आहे असे आमिष दाखवून तसेच तिला धमकी देऊन डिसेंबर २०२२ ते जानेवारी २०२३ या कालावधीत वारंवार तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले असल्याचे पीडित आईने तक्ररीत म्हण्टले आहे.

दरम्यान, याप्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, गुन्ह्याचा तपास राम नगर पोलीस ठाण्याच्या निकम मॅडम करत आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page