सत्यजित तांबे यांचे काँग्रेस मधून निलंबन…

Published:

मुंबई – सत्यजित तांबे यांच्यावर काँग्रेसकडून कारवाई करण्यात आली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात पक्षाचा आदेश झुगारून त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने याबाबत एक पत्र जारी केले आहे. त्यात नाशिक विभाग पदवीधर विधान परिषदेच्या निवडणुकीत आपण बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. आपले हे कृत्य पक्षशिस्तीचे उल्लंघन करणारे असल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशावरून तांबेंना ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आल्याचे लिहिले आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page