डोंबिवली – रिक्षा चालक असणाऱ्या दोघांनी एका महिलेचा विनयभंग केला असल्याची घटना घडली असून, याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. प्रभाकर पाटील आणि वैभव तरे अशी या दोघांची नावे आहेत.
याबाबत वृत्त असे आहे कि, हि महिला खिडकाळी बस स्टॉपवरुन घरी जाण्यासाठी रिक्षात बसली होती. त्यानंतर कोळेगाव नाका येथे रिक्षा आली असता रिक्षात असणाऱ्या या दोघांनी या महिलेचा विनयभंग केला.

दरम्यान, याबाबत रात्रपाळीवर असलेल्या बिट मार्शल पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी या रिक्षाचा पाठलाग करत या दोघांना अटक केली.