डोंबिवली- मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा उत्साह दिसून येत आहे. मुंबई तसेच ठाणे परिसरात अनेक ठिकाणी दहीहंडीचे भव्यदिव्य आयोजन करण्यात आले आहे. सकाळ पासूनच गोविंदाचा उत्साह शिगेला पोहचला होता.
भारतीय जनता पार्टीचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील बाजी प्रभू चौकात डोंबिवलीचा मानबिंदू दहीहंडी उत्सव २०२३ आयोजित केला होता. याठिकाणी अनेक गोविंदा पथकांनी मानवी मनोरे उभे करुन दहीहंडी उत्सव साजरा केला. दरम्यान या उत्सवात दहीहंडी फोडण्याचा मान डोंबिवलीतील अष्टविनायक मित्र मंडळाने मिळवून थर लावून हि दहीहंडी या मंडळाने फोडली.
तसेच या उत्सवाच्या निमित्ताने रविंद्र चव्हाण यांनी मोदी @ ९ या टॅगलाईन खाली ‘मोदी नवलाई’ या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला.