ठाणे – ठाणे महानगरपालिकेच्या स्वत:च्या योजनेचा व मे. स्टेम प्राधिकरणाकडून शुक्रवार दिनांक 08/09/2023 रोजी सकाळी 9.00 वाजल्या पासून ते शनिवार दिनांक 09/09/2023 रोजी सकाळी 9.00 वा पर्यत 24 तासांचा शटडाऊन घेऊन निगा देखभाल व दुरूस्तीमधील अत्यावश्यक व तातडीची कामे करुन घेण्यात येणार आहेत. परिणामी, या शटडाऊन कालावधीत शहरातील घोडबंदर रोड, लोकमान्यनगर, वर्तकनगर, साकेत, ऋतूपार्क, जेल, गांधीनगर, रुस्तमजी, इंदिरानगर, रुपादेवी, श्रीनगर, समतानगर, सिध्देश्वर, इटरनिटी, जॉन्सन, मुंब्रा व कळव्याच्या काही भागातील पाणीपुरवठा 24 तासांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे.
वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन ठाणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.