पुण्यात १ कोटींचे अफीम जप्त…

Published:

पुणे – १ कोटींचे अफीम अंमली पदार्थ विरोधी पथक, १ गुन्हे शाखा पोलिसांनी जप्त करून तिघांना अटक केली. सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंह राजपूत अशी या तिघांची नावे आहेत.

गोकुळनगर येथील लेन नंबर १ मधून कात्रज कोंढवा रोडकडे जाणाऱ्या स्नेहदत्त बिल्डींग जवळ एक इसम अफिम हा अंमली पदार्थ विक्री करत असल्याची  माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुषंगाने पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून सुमेर जयरामजी बिष्णोई याला ताब्यात घेतले.

त्याच्याजवळ ६४,४९,०००/- रु. चा ऐवज त्यामध्ये कीं.रु. ६४,२८,०००/- चा ३ किलो २१४ ग्रॅम आफिम मिळून आला. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत हा अफीम त्याने त्याच्या साथीदारांकडून आणला असल्याचे सांगितले. तसेच त्यांच्याजवळ अफीमचा साठा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी चावंडसिंग मानसिंग राजपूत आणि लोकेंद्रसिंह महेंद्रसिंह राजपूत या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ५२,२५,२००/-रु. चा ऐवज त्यामध्ये कीं. रु ५२,४,०००/- चा २ किलो ६०२ ग्रॅम अफिम आणि मोबाईल असा मुद्देमाल जप्त केला.

सदर प्रकरणी पोलिसांनी एकूण १,१६,७४०००/- रु चा ५ किलो ८१६ ग्रॅम अफीम जप्त केला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page