कल्याण – कल्याण-ठाकुर्ली रेल्वे मार्गावर अत्यंत दुर्देवी घटना घडली आहे. नाल्यावरुन जात असताना ४ महिन्यांचे बाळ हातातून निसटून पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले.
मिळालेल्या माहितीनुसार अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभा होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यावेळी बाळाला घेऊन आई आणि एक व्यक्ती निघाले होते. तेव्हा त्यांच्या हातून ४ महिन्यांचे बाळ निसटून पाण्यात पडले. आणि पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत वाहून गेले.