पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या एका इसमास मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुण्यातून अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार सागर बर्वे असे याचे नाव असून, तो आयटी इंजिनीअर आहे. सदर प्रकरणी लोकमान्य टिळक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुषंगाने पोलिसांनी तपास करून सागर बर्वे यास पुण्यातून अटक केली.
दरम्यान, सागर बर्वे याला स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले असून, न्यायालयाने त्याला १३ जून पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.