ठाणे – गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा घटक – २ भिवंडी पोलिसांनी अटक करून ४१ किलो गांजा हस्तगत केला. प्रसाद संतोश चौवले आणि किरण भक्तया कोंडा अशी या दोघांची नावे आहेत.
कल्याण भिवंडी वाहिनीवरील रांजणोली नाका ब्रिज खाली, भिवंडी येथे २ इसम गांजाची विक्री करण्यासाठी वाहतूक करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून या दोघांना अटक केली. त्यांच्याकडून ४१ किलो गांजा, १ कार, रोख रक्कम व २ मोबाईल फोनसह एकूण ११,५४,८००/-रु किंमतीच्या मुद्देमाल हस्तगत केला. तसेच कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सदरची यशस्वी कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या देखरेखीखाली सपोनि धनराज केदार, सपोनि प्रफुल्ल जाधव, पोउपनिरी रविंद्र चौधरी, पोहवा सुनिल साळुंखे, पोना सचिन जाधव, पोकॉ भावेश घरत, पोशि अमोल इंगळे, पोशि रोशन जाधव, चापोशि रविंद्र साळुंखे यांनी केली.