डोंबिवली – अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या दोघांना मानपाडा पोलिसांनी अटक केली. परशुराम रमेश करवले आणि अक्षय सोपान जाधव अशी या दोघांची नावे आहेत. दोघेही सातारा जिल्ह्यातील आहे. त्यांच्याकडून २ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ४ जिवंत काडतुसे जप्त केली.
डोंबिवली पूर्वेतील पांडुरंगवाडी, चंद्रहास हॉटेल जवळ १ इसम गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून परशुराम रमेश करवले यास अटक केली. त्याच्याकडे १ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळाली. त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या चौकशीत त्याने १ पिस्तूल सातारा येथील अक्षय सोपान जाधवला विक्री केल्याचे सांगितले. त्याअनुषंगाने पोलिसांनी अक्षय सोपान जाधवला साताऱ्यातून अटक केली. त्याच्याकडे १ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि २ जिवंत काडतुसे मिळाली.

सदर प्रकरणी दोघांना अटक करून त्यांच्याकडून ५०,०००/- रु. किंमतीची २ गावठी बनावटीचे पिस्तूल आणि ४००/- रु. किंमतीचे ४ जिवंत काडतुसे असा एकूण ५०,४००/- चा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त, ठाणे शहर जय जीत सिंग, पोलीस सह आयुक्त, ठाणे शहर दत्तात्रय कराळे, अपर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, कल्याण महेश पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहा पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अविनाश वनवे, पोहवा राजकुमार खिलारे, पोहवा दिपक गडगे, पोहवा संजु मासाळ, पोना प्रविण किनरे, पोना पलप्पा पाटील, पोना अनिल घुगे, पोना देवा पवार, पोशि महेंद्र मजा यांनी केली.