डोंबिवली – मृत व्यक्तीच्या नावाने बनावट कागदपत्रे बनवून फसवणूक करण्यात आल्याची धक्कदायक घटना डोंबिवलीत घडली असून, सदर प्रकरणी डोंबिवली पोलिसांनी २८९/२०२२ भादंविक ४२०,४६७,४६८,४७१ प्रमाणे गुन्हा दाखल करत फसवणूक करणाऱ्यास अटक केली. विमल जैन असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
फिर्यादी दिपक तन्ना यांच्या मालकीच्या गाळा नं. ०४, ए विंग मध्ये बऱ्याच वर्षा पासून राहणारे भाडेकरू विमल जैन यांचे पुजा ज्वेलर्स नावाचे दुकान होते. त्यानंतर सदर गाळा विमल जैन यांनी विकत घेतला होता. त्यानंतर जैन यांनी दुसरा गाळा नं. ०२. बी विंग हा भाडेतत्वावर घेतला होता. त्यावेळी सदर गाळयाचे इलेक्ट्रीक मिटर जैन यांनी तन्ना यांच्या परवानीशिवाय स्वत:च्या नावाने बनविले.
याबाबत तन्ना यांनी माहीतीच्या अधिकारात पेपर मागितले असता त्यामध्ये धक्कदायक माहिती समोर आली. मिटर हस्तांतरणाच्या कागदपत्रामध्ये तन्ना यांचा फोटो लावून व खोटया सह्या करण्यात आल्या होत्या. तसेच पॅनकार्ड तन्ना यांच्या वडिलांचे होते. परंतु तन्ना यांचे वडील १९८४ मध्येच मयत झाले असून, तन्ना यांच्या वडिलांचे आजच्या तारखेचे बनावट पॅनकार्ड, पागडी करार बनवले होते. आणि खोटी नोटरी करून सदर कागदपत्रे खरी असल्याचे दाखवून लाईट मीटर चे नाव बदली केले असल्याची माहिती समोर आल्याने विमल जैन याला डोंबिवली पोलिसांनी अटक केली. दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास एपीआय गणेश जाधव करत आहते.