डहाणू – डहाणू तालुक्यातील वाघाडी वांगडपाडा येथे जाण्यासाठी सूर्या उजवा कालवा ओलांडून जावे लागते.एकतर हा मुख्य कालवा असून यामधून मोठया प्रवाहाने पाणी वाहत असते. पाण्याची खोली देखील ५ ते ६ फूट असते.
वाघाडी मधील वांगडपाडा, पाटीलपाडा व दांडेकर पाडा येथील एकूण १६ ते १७ कुटुंबे राहत असून अनेक कुटूंबाची शेती या भागात आहे. त्यामुळे नेहमी शेती कामा निमित्त येथे नागरिकांना जावे लागते. त्याच बरोबर येथील नागरिकांना देखील कामधंद्या निमित्त, बाजारात, रुग्णालयात, शाळेत ये-जा कारवी लागते यासाठी तेथील नागरिकांनी सिमेंट चे खांब, खजुरी व अन्य झाडाच्या लाकडानी कालव्यावर स्वखर्चानी रस्ता तयार केला आहे. त्यावरून हा जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. नाहीतर एक ते दीड किलोमीटरचा वळसा घालून जावे लागत आहे.

त्यामुळे नेहमी हा प्रवास करताना अपघात घडत आहेत. पाय घसरून पाण्यात पडून अनेकांना त्रास झाला आहे. मोठ्या अंतरावर कालव्या वर पुल असून त्या वरून काही नागरीक ये जा करीत आहेत. पण हा प्रवास करताना खूप फिरून जावे लागत असल्याने लहान मुले, वृध्द नागरिकांचे खूप हाल होत आहेत. त्या मुळे येथील नागरिकांनी या भागात साकव बांधून मिळावे यासाठी आमदार-खासदार यांच्याकडे मागणी केली आहे. पण अनेक वर्षापासून हा धोकादायक प्रवास काही संपत नाही. पूर्वीच्या काळी खूप कमी लोकसंख्या होती. त्या वेळी वांगड पाडा येथे कमी घरे होती पण आता तेथे जास्त संख्येने घरे झाल्याने तेथील नागरिकांना ये जा करणे त्रासदायक होत आहे. त्यामुळे येथे साकव तयार करावे अशी मागणी ग्रामपंचायत मार्फत केली आहे.
प्रतिक्रिया –
अनेक लहान मुले व वृद्ध या कालव्याच्या वरील अरुंद झाडांच्या फानंद्या वापरून केलेल्या धोकादायक रस्त्यावरून जाताना अपघात ग्रस्त झालेत. त्यामुळे लवकरात लवकर येथे साकव झाले पाहिजे यासाठी मागणी करीत आहेत.
प्रशांत सातवी वाघाडी सरपंच.