डोंबिवली – अनेक ग्राहकांचे दागिने व पैसे घेऊन फसवणूक केलेल्या फरार ज्वेलर्सला डोंबिवली पोलीसांनी राजस्थानातून अटक केली. सोहनसिंह चैनसिंह दसाना असे त्याचे नाव आहे.
फिर्यादी मिनु प्रमोद गांधी यांच्या सह अन्य १५ जणांकडून सोहनसिंह चैनसिंह दसाना याने महालक्ष्मी ज्वेलर्स या ठिकाणी दागिने घेऊन त्या मोबदल्यात लोन देतो असे सांगून, तसेच दागिने बनविण्यासाठी आणखी रक्कम घेऊन, कोणतेही दागिने बनवून न देता घेतलेली रक्कम तसेच दागिने घेऊन फरार होऊन एकूण ३१.५३,२२०/- रुपये किंमतीचे (रोख रक्कम व दागिने) ची फसवणूक केली म्हणून, डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सोहनसिंह चैनसिंह दसाना याला राजस्थानातून अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी पोलीस उप आयुक्त, परिमंडळ -३, कल्याण सचिन गुंजाळ सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर, पो.नि गुन्हे तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि योगेश सानप, पोहवा विशाल वाघ, पोहवा प्रशांत सरनाईक, नितीन सांगळे, पो.शि.पाटील, पोहवा निसार पिंजारी कोळसेवाडी पी. ठाणे यांनी केली.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि योगेश सानप करत आहेत.