अंबरनाथ – १ लाखांची लाच घेणाऱ्या अंबरनाथ नगरपालिकेच्या लाचखोर स्वच्छता निरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. विलास भोपी असे याचे नाव आहे. विलास भोपी याने ३ लाख ८५ हजारांची लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हफ्ता घेताना एसीबीने भोपी यांना रंगेहात पकडले.
याबाबत वृत्त असे आहे कि, तक्रारदार हे काम करत असलेल्या कंपनीने सार्वजनिक शौचालय स्वच्छतेचे बिल मंजूर करून देण्याकरीता विलास भोपी यांनी तक्रारदार यांच्याकडे ३,७०,०००/- रु लाचेचे मागणी करुन त्यापैकी पहिला हप्ता म्हणून १,८५,०००/- रु. लाचेची मागणी केली होती. त्यातील १,००,०००/- रु. लाच पंढरपुर चाय, कोहोज गावचे प्रवेशद्वारा जवळ घेताना एसीबीने भोपी यांना रंगेहाथ पकडले.