डोंबिवली – अनैतिक संबंधातून एकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना डोंबिवली पूर्वेतील कोळेगांव येथे घडली. सदर प्रकरणी मानपाडा पोलिसांनी पत्नी आणि तिचा प्रियकर या दोघांना अटक केली. संध्या सिंग व वेदांत शेट्टी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत तर मारुती हांडे असे मृत पतीचे नाव आहे.
मारुती हांडे याचे संध्या सिंग नावाच्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. त्यातून त्यांनी लग्न केल्यानंतर ते कोळेगांव, डोंबिवली पूर्व येथे राहत होते. दरम्यान, सध्या सिंग हिचे सदर भागात राहणाऱ्या वेदांत उर्फ गुड्डु शेट्टी याच्यासोबत प्रेमसंबंध जुळले सदरची बाब मारुती हांडे यास माहिती झाल्यानंतर त्याच्यात व संध्या सिंग यांच्या वाद होऊ लागले, त्याने अनेक वेळा संध्या सिंग हिला समजविण्याचा प्रयत्न केला परंतु तिचे व वेदांत शेट्टी यांच्यातील प्रेमसंबंध चालूच राहिले होते. त्यामुळे मारुती हांडे आणि संध्या सिंग यांच्यातील वाद हा कायम राहिला. या प्रकारामुळे संध्या सिंग व वेदांत शेट्टी यांनी त्यांच्या प्रेमातील अडसर दुर करण्याचे ठरविले आणि मारुती हांडे यास जीवे ठार मारण्याचा प्लान केला, त्याप्रमाणे त्यांनी मारुती हांडे हा घरी जात असताना वेदांत शेट्टी याने स्टंम्पने मारुती हांडेला मारहाण करून गंभीर जखमी केले, त्यानंतर संध्या सिंग हिने वेदांत शेट्टी याच्या मदतीने मारुती हांडेला हॉस्पिटलमध्य नेले आणि त्यानंतर संध्या सिंग हिने मारुती हांडे याचे पहिल्या पत्नीस फोन करुन मारुती हांडेला कोणीतरी मारहाण केली असल्याचे सांगून तिला सदर ठिकाणी बोलावून घेतले. मारुती हांडेचे केस पेपर त्याच्या पत्नीकडे देऊन संध्या तेथून गुपचूप निघून गेली. त्यानंतर मारुती हांडेंवर उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. दरम्यान, पोलिसांनी सदर प्रकरणी तपास करून संध्या सिंग व वेदांत शेट्टी या दोघांना अटक केली.
सदरची यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुप्रावि कल्याण दत्तात्रय शिंदे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३ कल्याण सचिन गुंजाळ, सहा. पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग सुनिल कुराडे, वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनिरी. गुन्हे बाळासाहेब पवार, सपोनिरी. सुरेश डांबरे, सपोनि/अविनाश वनवे, सपोनि / सुनिल तारमळे, सपोउपनि / भानुदास काटकर, पोहेकॉ / सोमनाथ टिकेकर, पोहेकाँ/सुनिल पवार, पोहेकॉ/ संजय मासाळ, पोहेकॉ / शिरीष पाटील, पोना / प्रविण किनरे, पोना / अनिल घुगे, पोना/गणेश भोईर, पोकॉ/अशोक आहेर, पोका / विजय आव्हाड यांनी केली.