दुकानात घुसून ज्वेलर्स मालकाला बेदम मारहाण…

Published:

डोंबिवलीतील धक्कादायक प्रकार…

डोंबिवली – दुकानात घुसून ज्वेलर्स मालकाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना डोंबिवली पूर्वेत घडली असून, सदर प्रकरणी राम नगर पोलीस ठाण्यात १३८/२०२३ भादंवि कलम ४५२,४२७,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमल प्रकाश जैन असे मारहाण करण्यात आलेल्या दुकान मालकाचे नाव आहे. तसेच या घटनेत जैन यांच्या भावाला देखील मारहाण करण्यात आली. जैन यांचे पूजा ज्वेलर्स नावाचे मानपाडा रोड, डोंबिवली पूर्व येथे शॉप आहे. आर्थिक व्यवहारातून हि मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जैन यांनी महेंद्र शंकलेशा यांच्याकडून ज्वेलरीच्या व्यवसायाच्या संबंधाने एकूण ४ किलो सोने घेतले होते. त्यावर जैन यांनी दर महीना व्याजप्रमाणे १२० ग्रॅम सोने महेंद्र शंकलेशा यांना सन २०२२ पर्यंत व्याजासहीत पूर्ण दिलेले होते. तरी देखील महेंद्र शंकलेशा, अभिषेक शंकलेशा हे दुकानात आले आणि त्यांनी जैन आणि त्यांचा भाऊ कमलेश जैन यांना शिविगाळी करत मारहाण केली.

सदर मारहाणीत जैन यांच्या गळयातील अंदाजे किंमत ६०,०००/- रूपये किंमतीची १२ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तुटली सदरबाबत जैन यांनी दिलेल्या तक्रारीवरून राम नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राम नगर पोलीस करत आहेत.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page