भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या पोलिसांना मारहाण…

Published:

कल्याण – पती-पत्नी मधील भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील २ पोलिसांना पतीने मारहाण केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नागेशनाथ निवृत्ती घुगे आणि सांगळे अशी मारहाण झालेल्या कोळसेवाडी पोलीस ठाण्यातील हवालदारांची नावे आहेत. तर महेश माने असे पतीचे नाव आहे.

याबाबत वृत्त असे आहे कि, विजयनगर भागातील एका सोसायटीत पती आपल्या पत्नीला शिवीगाळ करुन मारहाण करत असून, त्या महिलेला मदतीची गरज असल्याने हे दोघे पोलीस तक्रारदार महिलेच्या घरी गेले असता त्याठिकाणी पती महेश माने हा पत्नीला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत तिला मारहाण करत होता. त्यावेळी या २ पोलिसांनी पती महेशला समजावून शांत राहण्यास सांगितले. परंतु महेश याने ते न ऐकता पोलिसांना मारहाण केली. त्या मारहाणीत घुगे हवालदाराला गंभीर दुखापत झाली.

दरम्यान, सदर प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page