साई विश्व फाऊंडेशन आयोजित सामाजिक उपक्रमासाठी आवाहन…

Published:

कल्याण – कुपोषण व त्यामुळे उद्भवणारे गंभीर आजार ह्यामुळे अनेक मुले व्याधीग्रस्त होऊन आपल्या जीवनातील आनंद गमावून बसतात आणि अनेक वेळा तर आपला जीव गमावतात. अशा मुलांसाठी साई विश्व फाऊंडेशनचे संस्थापक रो. मकरंद पुंडलिक ह्यांनी कुपोषणमुक्त भारत हे महत्वाकांक्षी मिशन हाती घेतले आहे. साई विश्व फाऊंडेशन ह्या संस्थेतर्फे तसेच वैयक्तिक पातळीवर आणि रोटरी सारख्या सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने गेली दहा वर्षे हे मिशन देशातील तेरा राज्यांमध्ये यशस्वीपणे राबवले जात आहे. आजमितीला १०००० पेक्षा अधिक कुपोषित बालकांना कुपोषणमुक्त करून त्यांना निरोगी करण्यात आले.

या उपक्रमासाठी निधी संकलन हेतू सुप्रसिद्ध मंगेशकर घराण्याचा वारसा यशस्वीपणे पुढे नेणाऱ्या गायिका डॉ राधा मंगेशकरांचा Evergreen Gems From Bollywood हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक ७ एप्रिल रोजी रात्री ८.३० वाजता कल्याण येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून अक्षरमंच प्रतिष्ठान यांचे सहकार्य लाभणार आहे.

ह्या कार्यक्रमासाठी देणगी मूल्य ₹५०० आणि ₹ ३०० ठेवण्यात आले आहे. साई विश्व फाऊंडेशनला दिलेल्या देणग्यांना  आयकराच्या 80G कलमांतर्गत सूट मिळणार आहे. तरी आपण जास्तीत जास्त सहकार्य करावे असे आवाहन साई विश्व फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रो. मकरंद पुंडलिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी त्यांना  ९९६७९१७६९० / ९४०४९०१२४० ह्या क्रमांकांवर संपर्क साधावा ही विनंती.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page