मालवाहू ट्रक-ऑटोचा भीषण अपघात…

Published:

नांदेड – नांदेड- मुदखेड रोडवरील मुगट गावाजवळ भरधाव मालवाहू ट्रक व ऑटोची समोरासमोर जोरदार धडक झाली. पेट्रोल पंपाशेजारी वळण रस्त्यावर झालेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर इतर 8 जण गंभीर जखमी झाले. जखमींना पुढील उपचारासाठी नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांना अपघाताची माहिती समजताच त्यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती जाणून घेतली. जखमी व्यक्तींबाबत विचारपूस करुन त्यांना तातडीने योग्य ते उपचार उपलब्ध करुन देण्याबाबत अधिष्ठाता डॉ. पी.टी. जमदाडे यांना सूचना दिल्या आहेत.

मृतांमध्ये ज्योती रमेश भोई वय 32, राहणार मेहकर, गालिअम्मा कल्याण भोई वय 35, रा.गेवराई, वेजल कल्याण भोई वय वर्ष 1, रा.गेवराई, पुंडलीक कोल्हाटकर वय-70, रा माळसावरगाव ता. भोकर, तर दवाखान्यात नेताना वाटेत विद्या संदेश हटकर वय 37, रा. इजळी ता. मुदखेड यांचा समावेश आहे. चार मृतदेह शवविच्छेदनासाठी मुदखेडच्या ग्रामीण रुग्णालयात हलविले आहेत. तर अपघातातील गंभीर जखमींना नांदेड येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे. जखमींवर सध्या उपचार सुरू आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page