छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोन गटात वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. त्यानंतर अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार किराडपुरा भागात राम मंदिराजवळ हा राडा झाला. जमावाने पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. दोन गटात बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. जाळपोळ आणि हाणामारी झाली. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे. राम मंदिरात कोणत्याही प्रकारचे नुकसान झालेले नाही.

दरम्यान नागरिकांना शांतता राखण्याचे आणि अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरातील सर्वपक्षीय नेत्यांनी देखील नागरिकांना शांततेचे आवाहन केले आहे. संपूर्ण परिसरात पोलीस तैनात करण्यात आले आहेत.