ठाणे – मनसेचे नेते अविनाश जाधव यांना मुंब्रा शहरात प्रवेशबंदी लागू केली आहे. अविनाश जाधव यांनी मुंब्रा शहरातील अनधिकृत मशीद, दर्गावर कारवाई केली नाहीतर त्याशेजारी हनुमानाचे मंदीर उभारण्यात येईल असा इशारा दिला होता. कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून ठाणे पोलिसांनी अविनाश जाधव यांना ९ एप्रिल पर्यंत प्रवेशबंदी आदेश जारी केले आहेत. तसेच या आदेशाचे उल्लंघन केले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे आदेशात सांगण्यात आले आहे.