कल्याण – इमारतीसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका १२ वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना कल्याण पूर्वेतील कैलास नगर परिसरात घडली.

रियान शेख असे मुलाचे नाव असून कल्याण पूर्व परिसरात इमारतीसाठी १ खड्डा खोदण्यात आला होता. हा खड्डा खोल असल्याने त्यात पाणी साचले होते. रियान खेळत असताना खड्ड्यात पडला. स्थानिक नागरिकांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला पण त्याला वाचवू शकले नाही. दरम्यान घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून मुलाला शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि रियानचा मृतदेह बाहेर काढण्यात आला.