नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. लोकसभा सचिवालयाने याबाबतचे आदेश जारी केले आहेत. सुरत मधील न्यायालयाने राहुल गांधी यांना 2 वर्षाची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर त्यांना जामीनही दिला होता. तसेच राहुल गांधी यांना उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ३० दिवसांची मुदतही दिली होती. मात्र, त्यापूर्वीच राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. लोकसभा सचिवालयाने तसे आदेश जारी केले आहेत. राहुल गांधी केरळ मधील वायनाड मतदारसंघातून लोकसभेवर निवडून आले आहेत.
राहुल गांधींनी कर्नाटकमध्ये प्रचारादरम्यान मोदी आडनावावरून टीका केला होती. त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी सूरत न्यायालयाने त्यांना २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यांना लगेच जामीन दिला होता.