नवी दिल्ली – शिवसेनेच्या संसदीय नेते पदावरुन खासदार संजय राऊत यांना हटवण्यात आले आहे. राऊत यांच्या जागी ज्येष्ठ नेते खासदार गजानन किर्तीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासंदर्भात लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून माहिती दिली आहे.
निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना दिल्यानंतर संजय राऊत यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. संजय राऊत यांच्या ऐवजी आता लोकसभा खासदार गजानन किर्तीकर यांची संसदेच्या नेतेपदी निवड करण्यात आली आहे.