डोंबिवली – आनंद कल्याणकारी सामाजिक संस्था, डोंबिवली तर्फे कन्यारत्न पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला. या संस्थेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त लेक लाडकी अभियान अंतर्गत फक्त कन्यारत्न असलेल्या महिला पालकांचा त्यांच्या पाल्यासह मान्यवरांच्या हस्ते ‘कन्यारत्न पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. श्री. राधाबाई साठे विद्यालय, रामनगर, डोंबिवली (पूर्व) याठिकाणी ४ मार्च २०२३ रोजी हा कार्यक्रम पार पडला.

कार्क्रमाला सुनिता घमंडी (एम.एस.डब्लू/ समुपदेशक सायन हॉस्पिटल, मुंबई), डॉ.योगेश जोशी (लेखक साहित्यिक), संगीता खर्डीकर (संचालिका, खर्डीकर क्लासेस) प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.शुभदा खटावकर (राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त व मा.मुख्यध्यापिका), हेमंत नेहते, डॉ. सुनील खर्डीकर, सुजाता घैसास, खेमचंद पाटील, आणि इतर उपस्थित होते.
