केडीएमसीच्या भ्रष्ट प्रभाग अधिकाऱ्यांचे करायचं काय?

Published:

कल्याण – कल्याण डोंबिवली महापालिकेत अनेक दिवसांपासून अनधिकृत बांधकामांचा प्रश्न ऐरणीवर असताना व ६८ बिल्डरवरती एसआयटी कारवाई झाली असून देखील प्रभाग क्षेत्र अधिकारी व पालिका अधिकारी सोयीनुसार काही राजकीय आशीर्वादाने जगणाऱ्या बिल्डरकडे कानाडोळा करताना दिसत आहे. यातील काही उदाहरण द्यायचे झाले तर ‘ग’ प्रभाग क्षेत्र ‘फ’ प्रभाग क्षेत्र याठिकाणी काही पालिका कर्मचारी व अधिकारी यांच्या आशीर्वादाने अनधिकृत बांधकामे चालू आहेत. यामध्ये भर पडत आहे ती ‘इ’ प्रभाग क्षेत्र अधिकारी यांना काही तक्रारी केली असता ती हद्द माझी नसल्याचे ते सांगतात. तुम्ही एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारा असे उत्तर देतात.

जेव्हा तक्रारदार एमआयडीसी अधिकाऱ्यांना विचारायला जातात तेव्हा त्यांना एमआयडीसीकडून आमच्या हद्दीचा सर्वे झाला नाही. आम्ही पालिका अधिकाऱ्यांना वारंवार पत्र देऊन देखील पालिका अधिकारी कोणतीही हद्द नेमून देत नाही. यामुळे आम्हाला तिथे कारवाई करता येत नाही. असे उत्तर देऊन तक्रारदारांना पळवून लावतात.

 

फ प्रभाग क्षेत्रामध्ये खांबळपाडा, शेलार सर्व्हिस सेंटरच्या पाठीमागे समशानभूमीच्या जागेवरती असणाऱ्या अनधिकृत जागेवरती तक्रार केली असता, सदर प्रभाग क्षेत्र अधिकारी यांनी टोलवाटोलवीची उत्तरे देऊन तक्रारदार यांना सांगितले कि, सदर बिल्डर हे मोठ्या राजकीय नेत्याचे निकटवर्तीय असल्याकारणाने आम्ही त्यांच्यावरती काय कारवाई करणार हो.

तसेच ‘ग’ प्रभाग क्षेत्रामध्ये भूमाफियाकडून तिवरीच्या झाडाची कत्तल करून एका राजकीय नेत्याच्या नावावरून १०० ते १५० अनधिकृत चाळी बांधलेल्या आहेत. सदर अनधिकृत चाळी प्रकरणी तक्रार केली असता ग प्रभाग कार्यालयातून राजकीय दबावापोटी आम्ही काय कारवाई करू शकतो असे उत्तर मिळाले आहे. जर पालिका अधिकारी व कर्मचारी राजकीय लोकांच्या दबावाखाली काम करत असतील तर पालिकेतील अनिधकृत बांधकाम व भ्रष्टाचार करणारे अधिकारी यांच्यावर आळा बसेल का ? आणि जे राजकीय पुढारी अनधिकृत बांधकामाच्या नावाने टाहो फोडत आहेत. त्यांच्याच आशीर्वादाने महापालिकेच्या हद्दीमध्ये अनधिकृत बांधकामे निदेर्शनास येत आहेत. यांना आळा घालणार कोण? 

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page