नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाने तूर्त नकार दिला आहे. परंतु ठाकरे गटाच्या आमदारांना व्हीप जारी करुन अपात्र करता येणार नाही, असे महत्त्वाचे निर्देश देऊन दोन आठवड्यानंतर पुढची सुनावणी होणार असल्याचे कोर्टाने सांगितले. तसेच हे प्रकरण सुप्रीम कोर्टात असे पर्यंत मशाल चिन्ह ठाकरे गटाकडे राहिल, असेही सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आगामी सुनावणी पर्यंत शिवेसना पक्षाकडून व्हीप जारी केला जाणार नाही, असे आश्वासन शिंदे गटाकडून देण्यात आले आहे. दोन आठवड्यानंतर या याचिकेवर पुन्हा एकदा सुनावणी घेतली जाईल.