ठाणे – ठाणे महापालिका अतिक्रमण विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांना राष्ट्रवादीचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांनी मारहाण केली. ठाणे पालिका मुख्यालयाच्या गेटवर हा प्रकार घडला.

जितेंद्र आव्हाड यांच्या कुटुंबियांना मारण्याबाबत एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ऑडिओ क्लिपमध्ये आव्हाडांच्या मुलीला आणि जावयाला मारण्याबाबतचा उल्लेख आहे. या ऑडिओ क्लिपमधील संभाषण सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचे असल्याचा आरोप करण्यात आला आहे. हि ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर महेश आहेर यांना मारहाण करण्यात आली. दरम्यान, आहेर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कुटुंबाला संपवण्यासाठी तिहार जेलमध्ये असलेला गँगस्टर बाबाजी उर्फ सुभाषसिंग ठाकूर याच्या मदतीने शूटर तैनात केल्याच्या संभाषणाची हि ऑडिओ क्लिप आहे.