ठाण्यातील गावदेवी भाजी मंडईत भीषण आग…

Published:

thane – ठाण्यातील गावदेवी भाजी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना घडली असून, या आगीत अनेक दुकान जळून खाक झाली असून, मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच दोन जणांचा मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास हि आग लागली. या मार्केटमध्ये भाजीपाला आणि कपड्यांची मोठी दुकाने असल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. परिसरात आगीच्या मोठमोठ्या ज्वाला आणि काळ्या धुराचे साम्राज्य पसरले. आगेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू केले.

या आगीत अग्निशमन दलाचा १ जवान आणि एका सुरक्षा रक्षकाचा मृत्यू झाला असून, दोन अग्निशमन कर्मचारी जखमी झाले आहेत. सागर शिंदे (अग्निशमन दलाचे जवान) आणि काळू गाडेकर ( सुरक्षा रक्षक) अशी मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page