फेरीवाला कायद्याची अमंलबजावणी करा…

Published:

dombivali – कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत असलेल्या डोंबिवलीत केडीएमसीकडून गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत फेरीवाल्यांवरती जोरदार कारवाई केली जात आहे. परंतु हि कारवाई फक्त ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्रात असलेल्या फेरीवाल्यांवरच करत असल्याचे चित्र आहे. दरम्यान, ‘ह’ प्रभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. त्यामुळे फेरीवाल्यांसंदर्भात जे नियम आहेत ते केवळ ‘ग’ आणि ‘फ’ प्रभाग क्षेत्रासाठीच आहेत का? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

‘ह’ प्रभागातील अनधिकृत फेरीवाल्यांवर कोणतीही कारवाई होत नाहीये. येथील आयुक्तांची मनमानी चालू असून, काही राजकीय नेते मंडळींसमोर आयुक्त झुकताना दिसत आहेत.

गेल्या दोन महिन्यांपासून हि कारवाई केली जात आहे. कारवाईचा गाजावाजा केला जात आहे. फेरीवाल्यांवर कारवाई न केल्यामुळे काही ठराविक कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस दिली जाते. मग हीच नोटीस ‘ह’ प्रभाग क्षेत्र पथक प्रमुखांना द्यायला काय अडचण आहे?

तसेच प्रस्थापिक नगरसेवकांनी महासभेत फेरीवाले १५० मीटर मध्ये नको म्हणून गोंधळ घातला पण नगरसेवकांनी फक्त ‘ग’ ‘फ’ प्रभागाचा उल्लेख केला यात कुठेही ‘ह’ प्रभागाचा उल्लेख केला नाही. त्यामुळे नगरसेवकांचे ‘ह’ प्रभागात काही लागेबंध आहते का?

दरम्यान, फेरीवाल्यांवर कारवाई नक्की करा, पण अगोदर फेरीवाला धोरण २०१४ कायद्याची अंमलबाजवणी करा. फेरीवाल्यांना पर्यायी जागा द्या आणि मग त्यांच्यावर कारवाई करा. पण असे होताना दिसात नाही. पालिकेला फेरीवाला दिसतात ते पण फक्त ‘ग’ ‘फ’ प्रभागात ‘ह’ प्रभागा बाबत यांनी डोळ्यावर पट्टी लावली आहे. फेरीवाल्यांवर सरसकट कारवाई का करत नाही?

त्यामुळे केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल फक्त नावापुरते आहेत. तर येथील स्थानिक राजकीय नेते पालिका चालवत आहते. आणि पालिका आयुक्त ज्या बदल्या करतात त्यांच्या आदेशाला पालिकेतील काही कर्मचारी केराची टोपली दाखवतात आणि ते वर्षानुवर्षे एकाच जागेवर पथक प्रमुख म्हणून काम करतात.
आयुक्त गोयल यांना हे दिसत नाही का? कर्मचाऱ्यांसाठी कायदा वेगळा आहे का?

आयुक्त गोयल यांनी फेरीवाल्यांवरती होणारी कारवाई थांबवली पाहिजे. तसेच जोपर्यंत फेरीवाला धोरण अमंलबजावणी होत नाही किंवा सरसकट कारवाई होत नाही तोपर्यंत तरी प्रस्थापित नागरसेवकांनी सांगितलेले येथे कारवाई करा, तेथे कारवाई करा हे ऐकणे बंद केले पाहिजे. कारण फेरीवाला देखील एका गरीब वर्ग आहे. याचे भान ठेवा.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page