ठाणे जिल्हा परिषदेची खोटी सही-शिक्के वापरून फसवणूक; मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; आरोपी मोकाट…

Published:

dombivali – इमारतीसाठी ठाणे जिल्हा परिषदेची खोटी सही-शिक्के वापरून संबंधित रहिवाशांची फसवणूक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सदर प्रकरणी रहिवाशांनी तक्रार दिल्यानंतर चार जणांविरुद्ध BNS 3(5),318(4),336(2),336(3),340(2),337,338,343 तसेच नोंदणी अधिनियम 1908 चे सेक्शन 82(अ), 82(ब),82(क) नुसार मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण मिसाळ (अध्यक्ष, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना) , मोहनलाल चौधरी आणि रामदास टेकाळे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. परंतु मानपाडा पोलिसांनी अजूनही या आरोपीना अटक केलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, डोंबिवली पूर्वेतील सागाव, मानपाडा रोड याठिकाणी असलेलया एका चाळीच्या जागी अधिकृत इमारत बांधून देण्याचे रामचंद्र माने यांनी तेथील रहिवाशांना प्रस्ताव दिला होता. असे तक्रारदाराचे म्हणणे आहे. त्याप्रमाणे इमारत बांधण्यात देखील आली परंतु या इमारती संदर्भात तेथे राहणाऱ्या एका रहिवाशाने चौकशी केली असता, हि इमारत अनधिकृत असल्याची माहिती समोर आली. याचे कोणतेही महत्त्वाचे कागदपत्र उपलब्ध नाहीत तसेच ठाणे जिल्हा परिषदेने इमारतीसाठी कोणतीही परवानगी दिलेली नसताना, ठाणे जिल्हा परिषदेने परवानगी दिली असल्याचे खोटे कागदपत्र रहिवाशांना देण्यात आले आणि त्यात जिल्हा परिषदेची खोटी सही-शिक्के वापरल्याचे देखील उघड झाले आहे.

दरम्यान, या प्रकारणी मानपाडा पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु इतकी मोठया प्रमाणात फसवणूक झालेली असताना देखील अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. सदर आरोपी रामचंद्र माने, लक्ष्मण मिसाळ (अध्यक्ष, महाराष्ट्र जनरल मजदूर संघटना) , मोहनलाल चौधरी आणि रामदास टेकाळे यांच्यावर स्थानिक राजकारणी लोकांचा वरदहस्त असल्याकारणाने मानपाडा पोलीस अटक करत नसल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.

अलीकडच्या काळात सामान्य जनतेची वारंवार फसवणूक होत आहे. दिवसेंदिवस अनधिकृत बांधकाम जोरदार होत आहेत अशातच हे फसवणुकीचे गंभीर प्रकरण समोर आल्यानंतरही मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ संदीपान शिंदे कोणतीच कारवाई करत नसल्याचे दिसते.

मानपाडा पोलीस ठाण्याचे काम फक्त गुन्हा दाखल करून घेणे इतकच आहे का? गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढील तपास करून आरोपीना का अटक केली जात नाही? मानपाडा पोलीस कोणच्या दबावाखाली काम करत आहेत का? कारण अनेक गुन्हे मानपाडा पोलीस ठाण्यात दाखल होतात मात्र कारवाई होत नाही आणि त्यात राजकीय पक्षांशी संबंधित गुन्हेगार असतील तर मग त्यांना पाठीशी घातले जाते असे दिसते. यावरून मानपाडा पोलिसांवर राजकीय पक्षांचा दबाव आहे असे दिसून येत आहे. म्हणून मानपाडा पोलीस ठाण्यात केवळ गुन्हा दाखल करून घेतला जातो असे चित्र सध्या मानपाडा पोलीस ठाण्याचे झाले आहे. त्यामुळे या संदर्भात ठाणे आयुक्त, कल्याण डीसीपी, डोंबिवली एसीपी यांनी दखल घेऊन मानपाडा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठांची चौकशी करावी.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page