PAWS चे संस्थापक निलेश भणगे यांनी बार्न आऊल ची सुरक्षित सुटका केली.

Published:

badlapur – ‘PAWS’ (Plants & Animals Welfare Society) चे संस्थापक निलेश भणगे यांनी नुकतेच एका बार्न आऊल (Barn Owl) ची सुरक्षित सुटका केली आहे. हे घुबड बहुधा रस्ता चुकल्यामुळे एका घराच्या गॅलरीत आले होते, ज्याची त्वरित सुटका करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

बदलापूर येथून एका घराच्या गॅलरीत किंवा इमारतीच्या परिसरात घुबड आल्याची माहिती PAWS च्या हेल्पलाइनवर मिळाली होती. माहिती मिळताच निलेश यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली आणि बार्न आऊलची सुरक्षित सुटका केली. पक्ष्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर, तो रस्ता चुकल्याचे स्पष्ट झाले आणि संध्याकाळी त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले.

दरम्यान, निलेश भणगे यांनी आपल्या मित्रांसोबत मिळून कल्याण-डोंबिवली आणि आसपासच्या परिसरासाठी या संस्थेची स्थापना केली. ही संस्था गेली २८ वर्षे कल्याण, डोंबिवली आणि ठाणे परिसरात मोलाचे वन्यजीव बचाव कार्य करत आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page