thane – घरफोडी चोरी करणाऱ्या अट्टल चोरटयांना अटक करुन घरफोडीसह एकूण १८ गुन्हे उघडकीस आणण्यात मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा पोलिसांना यश आले आहे. विनयकुमार पासवान, प्रदिप निशाद, राजविर लाहोरी आणि सलमान अली अहमद अली शेख अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मेडीकल शॉप तसेच इतर ०५ दुकानांचे शटर उचकटुन कोणीतरी अज्ञात चोरटयानी मोबाईल व रोख रक्कम चोरी केली असल्याबाबत नौपाडा पोलीस ठाण्यात गु.र.नं. १३/२०२६ भा.न्या.सं. कलम ३०५ (a), ३३१ (४), ३(५), ६२ प्रमाणे गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा मालमत्ता गुन्हे कक्ष, गुन्हे शाखा यांचा समांतर तपास सुरू होता.
त्याअनुषंगाने पोलिसांनी तपास करून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर चौघांना अटक केली. तसेच त्यांच्याकडून १,२५,०००/- रू. किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे ०६ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत. सदर प्रकरणात आरोपी सद्या टिळकनगर पो.स्टे. च्या पोलीस कोठडीत आहेत.
सदरची यशस्वी कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त गुन्हे, ठाणे, विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, शोध २, गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वपोनिरी/गोरखनाथ घार्गे, मपोउनि/शितल पाटील, पोउनि /संजय भिसे, सपोउनि / शिवाजी गायकवाड, पोहवा/दिनेश कुंभारे, जयकर जाधव, प्रशांत भुर्के, संदीप भांगरे, महेश साबळे, राहुल शिरसाठ, पोना/सचिन वानखेडे, सचिन कोळी, तौसीफ सैयद, पोअं/महेश सावंत, चापोअं/सदन मुळे, तसेच मपोहवा /आशा गोळे, मपोना/गिताली पाटील यांनी केली आहे.


