dombivali – डोंबिवली येथील आजदे गावामधील विश्व साईं को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये सत्यनारायण महापूजा भक्तिभावाने पार पडली. या पूजेला सोसायटीतील सर्व सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. गेल्या १५ वर्षांपासून या सोसायटीत सत्यनारायणाची पूजा केली जाते. हि परंपरा कायम ठेवत याहीवर्षी सोसायटीमध्ये सत्यनारायण महापूजा तितक्याच उत्साहाने पार पडली.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगरसेवक विनोद कालण यांनी उपस्थिती लावली. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमास विशेष महत्त्व प्राप्त झाले. पूजा, प्रसाद वितरण अन्नप्रसादाची व्यवस्था आणि सामाजिक सलोखा यामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

तसेच कार्यक्रमात मनोरंजनाचे कार्यक्रम देखील घेण्यात आले यात डान्स, गाणे, फन ऍक्टिव्हिटी सोसायटी सदस्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.


