kalyan – कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या विरुद्ध महात्मा फुले चौक पोलिसांनी कारवाई केली. सदर कारवाई मध्ये ४ एजंट आणि १० पिडीत वारांगना अशा १४ महिलांवर पिटा अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
सदर प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाणे येथे गुरजिन. 107/26 बीएनएस कलम 143(3),3(5) सह अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन 1956 चे कलम 4 व 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, शहरातील बार व तत्सम आस्थापनांवर पुढील काळातही तपासणी मोहीम सुरू राहणार आहे.


