dombivali: छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी…

Published:

dombivali – महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (ता. १९, गुरुवार) रोजी राज्यासह देशात उत्साहात साजरी करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांची 396 वी जयंती होती.

डोंबिवली पश्चिमेतील गोवरसवाडी जिजाई नगर येथे देखील मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

त्यावेळी पंचशील प्रतिष्ठान अध्यक्ष संस्थापक प्रवीण रामदास साळवी, ज्येष्ठ कार्यकर्ते देवराम पारधे, पंडित, डोळस, वायू प्रथमेश कांबळे, पंकज साळवी आणि मंडळाचे मार्गदर्शक वाकचौरे, शेख, पत्रकार लक्ष्मण हजारे, भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित नगरसेवक अभिजीत थरवळ आणि त्यांचे सहकारी कार्यकर्ते तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे शाखा प्रमुख संजय मांजरेकर हे देखील त्यांच्या कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page