dombivali – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील काही अधिकारी व कर्मचारी हे राजकीय छत्री वापरत असून, याचाच मोठा परिणाम ह प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्यावर झालेला दिसत आहे. ह प्रभागात अनेक ठिकाणी अनागोंदी कारभार चालू आहे असे दिसते, ह प्रभागात अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, प्लस्टिकचा वापर सर्रासपणे होत आहे. तसेच केडीएमसी आरोग्य विभागाचे काही कर्मचारी हजेरी लावून घरी जात असल्याची माहिती समोर आली आहे. हे कर्मचारी काम करताना दिसत नाहीत. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही.

ह प्रभाग क्षेत्रात अनेक ठिकाणी अनधिकृत फेरीवाल, बांधकाम, प्लस्टिक वापर संदर्भात अनेक तक्रार अर्ज केडीएमसी ह प्रभाग क्षेत्र अधिकारी राजेश सावंत यांच्याकडे करण्यात आलेली आहे. पण राजेश सावंत हे नागरिकांच्या तक्रार अर्जाला केराची टोपली दाखवत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, महाराष्ट्र न्यूजकडे अशा अनेक तक्रारी आल्या असता, महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून लक्ष्मण हजारे यांनी याबाबत वारंवार पाठपुरावा केला असता राजेश सावंत हे खाजगी मध्ये दबक्या आवाजात सांगतात कि, आम्ही कारवाई करू शकत नाही, काय करणार इथे पालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवरती खूप राजकीय दबाव आहते.
कधी खासदार, आमदार, नगरसेवक त्यांचे पीए तर कधी आमच्याच कार्यालयात राजकीय छत्री घेऊन बसलेले कर्मचारी मोठया पुढाऱ्यांचा दबाव आणतात. त्यामुळे आम्हाला जीव मुठीत घेऊन काम करावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र न्यूज च्या मध्यातून आम्ही जनतेला सांगू इच्छितो कि, केडीएमसी कर्मचारी, अधिकारी, बिल्डर हेच राजकीय पुढाऱ्यांचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही आणि यामुळे पालिकेला याचा आर्थिक तोटा सहन करावा लागतो. तसेच यामुळे गोरगरीब जनतेसाठी पालिकेची होणारी कामे हि होत नाहीत.

उदाहरण द्यायचं झालं तर पालिकेची शाळा, रुग्णालय, गटार, नवीन रस्ता बनवायच्या नावाखाली खोदून ठेवलेले रस्ते, दूषित पाणीपुरवठा, कचरा कुंडी या सर्व सोयी सुविधा नागरिकांना योग्यरीत्या मिळत नाही. याला जबाबदार पालिकेचे कर्मचारी आणि अधिकारी आहेत असे दिसते.
त्यामुळे महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांनी अशा राजकीय दबावाखाली काम करणारेअधिकारी कर्मचारी, हजेरी लावून घरी जाणारे यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी.


