thane – ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने ठाण्यातील आदिवासी दुर्गावाडी पाड्यातील नागरिकांना ब्लॅंकेटचे वाटप करण्यात आले.

वृद्ध, लहान मुले आणि बेघर लोकांना थंडीपासून संरक्षण मिळावे, या उद्देशाने ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.

या सामाजिक कार्यातून अनेक चेहऱ्यांवर आनंद आणि समाधान फुलले, जे आमच्यासाठी खूप मौल्यवान आहे. अशा भावना ओम विजय नवजीवन महाराज चॅरिटेबल ट्रस्टने व्यक्त केली.

दरम्यान, भविष्यात देखील असे सामाजिक उपक्रम राबविण्याचा या ट्रस्टचा मानस आहे.


