thane – एम.डी. (मेफेड्रोन) अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या रॅकेटचा खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा, ठाणे पोलिसांनी पर्दाफाश केला असून, याप्रकरणी पोलिसांनी ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) आणि मोबाईल असा एकूण १,००,९२,०००/- रू किमंतीचा मुद्देमाल जप्त करून सहा जणांना अटक केली आहे.
कापूरबावडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्हा रजि नंबर ७५६/२०२५ एनडीपीएस ऍक्ट १९८५ कलम ८ (क), २१ (ब), २१ (क), २९ या गुन्हयाचे तपासादरम्यान पोलिसांनी सचिन चव्हाण यास अटक करून त्याच्याकडून २९.०६ ग्रॅम वजनाचा एम.डी जप्त केला. त्यानंतर मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलिसांनी रवि डागुर यास अटक करून त्याच्याकडून ३४ ग्रॅम वजनाचा आणि घर झडतीमध्ये ९२२ ग्रॅम वजनाचा एम.डी. (मेफेड्रोन) जप्त केला तसेच एकूण ६ जणांना अटक केली. आणि ९९९.२ ग्रॅम वजनाचा एम.डी., मोबाईल असा एकूण १,००,९२,०००/- रू किमंतीचा मुद्देमाल जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी अमरसिंह जाधव, पोलीस उप आयुक्त, (गुन्हे), ठाणे, विनय घोरपडे, सहाय्यक पोलीस आयुक्त, शोध-२, गुन्हे शाखा, ठाणे यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी, सपोनि/सुनिल तारमळे, सपोनि/कृष्णा गोरे, सपोनि/कापडणीस, पोउपनिरी/तावडे, सहापोउपनिरी/भोसले, सहापोउपरी / कानडे, पोहवा/ठाकुर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे, मपोहवा/पावसकर, चापोहवा / हिवरे, पोना / हासे, मधाळे, पोशि/वायकर, शेजवळ, ढाकणे, पाटील, मपोशि/ भोसले यांनी केली.
दरम्यान, गुन्ह्याचा पुढील तपास खंडणी विरोधी पथक, ठाण्याचे सपोनि सुनिल तारमळे करत आहेत.


