new delhi – संसदेचे हिवाळी अधिवेशन १ डिसेंबर पासून सुरू होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याला मंजुरी दिली आहे. हे अधिवेशन १ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत होईल. केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरण रिजिजू यांनी याबद्दलची माहिती दिली.
रिजिजू म्हणाले, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी १ डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन घेण्याच्या सरकारच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. आपल्या लोकशाहीला बळकटी देणाऱ्या आणि लोकांच्या आकांक्षा पूर्ण करणाऱ्या फलदायी अधिवेशनाची आम्हाला अपेक्षा आहे.


