कल्याण शीळ रोडवर वाहतुकीत बदल…

Published:

kalyan – रेल्वे प्रशासनाच्या मालवाहू वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या दिल्ली ते जेएनपीटी या फ्रेट कॉरीडॉर प्रकल्पातील सीटीपी ११ या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या मार्गावरील निळजे रेल्वे उड्डाणपुलाची उंची कमी असल्याने डीएफसीसीच्या डबल कंटेनर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण होत आहे. यामुळे हा जुना उड्डाणपूल तोडून नव्याने त्याची बांधणी करण्यात येणार आहे. यासाठी ७ ते ९ नोव्हेंबर या कालावधीत वाहतुकीत बदल करण्यात आला आहे.

टाटा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीमार्फत या प्रकल्पाचे काम सुरू आहे. हे काम राज्य महामार्ग क्र. ७६ लोढा पलावा एक्सपेरिया मॉल जवळ कल्याणहून शिळफाटाकडे जाणाऱ्या वाहिनीवर होणार आहे. या मार्गावरील निळजे रेल्वे ओव्हर ब्रिजची उंची कमी असल्याने तो तोडून त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी तीन दिवसांचा कालावधी लागणार असून, ७ नोव्हेंबरला मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते ९ नोव्हेंबर रात्री १२ वाजेपर्यंत हे काम करण्यात येणार आहे. या कामासाठी कल्याण शिळ रोडवरील वाहतुकीत तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलिस उपायुक्त पंकज शिरसाट यांच्या आदेशानुसार अधिसूचना वाहतूक विभागाने जारी केली आहे.

वाहतुकीतील बदल…

प्रवेश बंद 1– कल्याणकडून शिळफाट्याकडे जाणाऱ्या सर्व वाहनांना निळजे कमानीजवळ प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना निळजे कमानीजवळून उजवीकडे वळून लोढा पलावाच्या मार्गावरून महालक्ष्मी हॉटेलजवळून इच्छित स्थळी जाण्याचा पर्याय दिला आहे.

प्रवेश बंद 2– लोढा पलावा, कासाबेला, लोढा हेवन आणि एक्सपिरिया मॉलकडून कल्याणकडे जाणाऱ्या वाहनांना निळजे पुलाच्या चढणीवरून प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना कल्याण-शिळ महामार्गाने शिळफाटा, देसाई खाडीपूल आणि सरस्वती टेक्सटाईलजवळून उजवीकडे वळण घेऊन नवीन पलावा उड्डाणपूलावरून इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग दिला आहे.

प्रवेश बंद 3– मुंब्रा आणि कल्याण फाट्याकडून कल्याणकडे जाणाऱ्या जड/अवजड वाहनांना कल्याण फाटा येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून या वाहनांना कल्याण फाटा-शिळफाटा-मुंब्रा बायपास-खारेगाव टोलनाका मार्गे इच्छित स्थळी जाण्याची सोय करण्यात आली आहे.

प्रवेश बंद 4– कल्याणकडून मुंब्रा/कल्याण फाट्याकडे जाणाऱ्या चाकी आणि जड/अवजड वाहनांना काटई चौक येथे प्रवेश बंद आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना काटई चौक-खोणी नाका-तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाण्याची सोय आहे.

प्रवेश बंद 5– तळोजा एमआयडीसी मार्गे नवी मुंबईतील खोणी नाका आणि निसर्ग हॉटेलकडून काटई/बदलापूर चौकाकडे येणाऱ्या जड/अवजड वाहनांना निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना निसर्ग हॉटेल जवळून उजवीकडे वळून काटई/बदलापूर पाईपलाइन मार्गे इच्छित स्थळी जाण्याचा मार्ग दिला आहे.

प्रवेश बंद 6– अबरनाथ आणि बदलापूरकडून काटई-बदलापूर पाईपलाइन मार्गे काटई चौकाकडे येणाऱ्या जड आणिअवजड वाहनांना निसर्ग हॉटेल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्ग म्हणून वाहनांना डावीकडे वळून तळोजा एमआयडीसी मार्गे इच्छित स्थळी जाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page