कल्याण – कल्याणमध्ये ४०० कोरेक्स बाटल्यांसह एकास अटक करण्यात आली आहे. हि कामगिरी कल्याण पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ यांच्या विशेष कारवाई पथकाने केली. मोहम्मद मताब अनिस रईस असे या अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण पोलीस उपआयुक्त परिमंडळ ३ यांचे विशेष कारवाई पथक बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत अंमली पदार्थ विरोधी कारवाई कामी गस्त करीत असताना फोर्टीज हॉस्पिटल जवळ त्यांना एक इसम संशयास्पद मोटरसायकल वरून काहीतरी घेऊन जात असताना आढळून आल्याने त्याला थांबवून त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण ४०० कोरेक्सच्या बाटल्या मिळून आल्या. तसेच त्याने त्याचे नाव मोहम्मद मताब अनिस रईस असे सांगितले.
सदर प्रकरणी पोलिसांनी ४,००,०००/- रु. किंमतीच्या एकूण ४०० कोरेक्सच्या बाटल्या, ६०,०००/- रु. किंमतीची मोटारसायकल आणि ३६६०/- रु. रोख रक्कम जप्त केली असून, बाजारपेठ पोलीस ठाण्यात मोहम्मद मताब अनिस रईस याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पुढील तपास पोलीस करत आहेत.


