new delhi – भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची भारताचे पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केंद्राकडे केली आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत हे सध्याच्या CJI नंतर सर्वोच्च न्यायालयातील दुसरे सर्वात वरिष्ठ न्यायाधीश आहेत. जर केंद्र सरकारने त्यांची शिफारस स्वीकारली तर ते २३ नोव्हेंबर रोजी CJI गवई यांच्या निवृत्तीनंतर २४ नोव्हेंबर रोजी देशाचे ५३ वे CJI होतील.
माहितीनुसार, सरन्यायाधीश गवई यांनी न्यायमूर्ती सूर्यकांत यांची पुढील सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी केंद्रीय कायदा मंत्रालयाकडे शिफारस केली आहे. सरकारकडून अधिसूचना निघाल्यानंतर २३ नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश भूषण गवई आपले पद सोडतील. त्यानंतर न्यायमूर्ती सूर्यकांत भारताचे ५३ वे सरन्यायाधीश म्हणून पदाभार स्वीकारतील. न्यायमूर्ती सूर्यकांत या पदावर ९ फेब्रुवारी २०२७ पर्यंत राहतील.


