गुंडगिरीमुळे डोंबिवली पश्चिमेतील पेट्रोल पंप रात्रीच्यावेळी बंद…

Published:

dombivali – डोंबिवली पश्चिमेतील एका पेट्रोल पंपावर रात्रीच्यावेळी होणाऱ्या वाढत्या गुंडगिरीमुळे पेट्रोल पंप चालकावर पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ आली आहे.

डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर, गणेशनगर परिसरातील पेट्रोल पंपावर काही मध्यधुंद, गर्दुले तरुण गाडीत पेट्रोल भरण्यासाठी येतात. गाडीत पेट्रोल भरून झाल्यानंतर मग पैसे देण्यावरून तेथील कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन, शिवीगाळ करतात. विनाकारण त्रास देणे, हुज्जत घालून त्यांना दमदाटी, मारहाण करून पेट्रोलचे पैसे न देता निघून जातात. अशा या वाढत्या गुंडगिरीला कंटाळून पेट्रोल पंप मालक सुरेश मोरे यांनी आपला पेट्रोल पंप रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश मोरे यांनी सदर पंपाबाहेर एक मोठा बॅनर लावला आहे. त्यात त्यांनी असे लिहिले आहे कि, पेट्रोल पंपाची वेळ ही सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत असेल. रात्रीच्या वेळेस दारू पिऊन काम करणाऱ्या मुलांना शिवीगाळ करणे, धमकी देणे या त्रासाला कंटाळून रात्री पंप बंद राहील.

दरम्यान, गेल्या काही वर्षात डोंबिवलीत मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी वाढताना दिसत आहे. या गुन्हेगारीत चोरी, दरोडे, चैन स्नॅचिंग, अंमली पदार्थ, खून महिलांवर अत्याचार अशा गुन्ह्यांची वाढ झपाट्याने होताना दिसत आहे. परंतु संबंधित पोलीस स्टेशन याबाबत कोणतीही ठोस कारवाई करताना दिसत नाहीत. त्यामुळेच या गुंड लोकांची गुंडेशाही, दादागिरी, धमकी, अरेरावीपणा वाढत चालला आहे. आणि अशा प्रकारणामुळे आता शहरातील नागरिकांच्या रात्रीच्या सुरक्षिततेबद्दल प्रश्न निर्माण झाला आहे.

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page