thane – अवैध विदेशी मद्य वाहतुकीवर उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत २.२२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ठाणे जिल्ह्यातील तळोजा रूफिंग उद्योगसमोर, सदुद्दीन इस्टेट, मुंब्रा-पनवेल रस्ता, मंजरली येथे गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये मागील बाजूस मोठ्या प्रमाणात अवैध विदेशी मद्याचा साठा आढळून आला. या ट्रकमध्ये विविध ब्रँडच्या विदेशी मद्याचे एकूण १,५६० बॉक्स आढळले.

या कारवाईमध्ये ट्रकसह परराज्यातील विदेशी मद्याचे १,५६० बॉक्स, तीन मोबाईल असा अंदाजित २ कोटी २२ लाख ६९ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे विविध कलमान्वये गुन्हा नोंद करून वाहन चालक साहिद मेहमूदा खान आणि पंकज जगदीश साकेत यांना अटक करण्यात आली आहे.