dombivali – पलावा (kDMC) अग्निशमन दल कार्यालयात अग्निशामक कर्मचाऱ्यांसाठी सायबर जनजागृती सत्राचे आयोजन करण्यात आले होते. हे सत्र ठाणे जिल्हा आगरी शिक्षण प्रसारक मंडळ प्रगती महाविद्यालय तर्फे अनुष्का गाडे व ईश्वरी किजबिले यांनी घेतले. या सत्रामध्ये सायबर गुन्हे, फोटो मॉर्फिंग, बनावट व्हिडिओ कॉल फसवणूक, ओटीपी फसवणूक, बनावट लिंक्स तसेच ऑनलाईन सुरक्षितता यासंबंधी महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली.
अग्निशामक कर्मचाऱ्यांनी स्वतःचे अनुभव सांगून या चर्चेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विशेषत: बनावट आग लागल्याच्या बातम्या व त्याचा आपत्कालीन सेवांवर होणारा परिणाम या विषयावर सत्रात भर देण्यात आला. हे सत्र अत्यंत संवादात्मक झाले असून उपस्थितांकडून त्याचे कौतुक करण्यात आले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी मौल्यवान सहकार्य व पाठिंबा दिल्याबद्दल भारत पवार व अनंत राणे यांचे विशेष आभार मानण्यात आले.
या विशेष यशामध्ये क्विकहिल फाउंडेशनच्या अध्यक्षा अनुपमा काटकर, सह-संचालक अजय शिर्के, तसेच सक्रिय टीम सदस्य साक्षी लवंगारे, गायत्री केसकर व दीपू सिंग यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना सायबर सुरेक्षेच्या क्षेत्रात नवे दालन खुले झाले आहे.


