thane – कल्याण पश्चिमेतील एका ऑफिसमधून लॅपटॉप, प्रिंटर आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्यास मालमत्ता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नाशिकच्या मनमाडमधून अटक केली आहे. समीर उर्फ उल्लू शब्बीर शेख असे याचे नाव आहे.
याबाबत वृत्त असे आहे कि, कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या एका लिफ्टच्या ऑफिसमधून लॅपटॉप, प्रिंटर आणि रोख रक्कम चोरीस गेले असल्याबाबत ऑफिसच्या मालकाने बाजारपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. तसेच हि चोरी त्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या समीर उर्फ उल्लू शब्बीर शेख याने केली असल्याचा संशय ऑफिसच्या मालकाला होता. याप्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि याचा समांतर तपास मालमत्ता गुन्हे शाखेकडून सुरु होता.
त्यानुषंगाने मालमत्ता गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपास करून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे मनमाड ग्रामीण पोलीस ठाणे हददीतील चंदनवाडी, आय.एफ.सी. रोड, मनमाड जि. नाशिक येथून समीर उर्फ उल्लू शब्बीर शेख यास अटक केली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेला प्रिंटर जप्त केला.
सदरची यशस्वी कामगिरी पंजाबराव ऊगले अप्पर पोलीस आयुक्त गुन्हे ठाणे शहर, अमरसिंह जाधव पोलीस उप आयुक्त गुन्हे, विनय घोरपडे सहा पोलीस आयुक्त (शोध 2) यांच्या मार्गदर्शनाखाली मालमत्ता गुन्हे कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोरखनाथ घार्गे, सहा उपनिरीक्षक गायकवाड, पोलीस हवालदार कामत, पोलीस नाईक सचिन वानखेडे, पोलीस शिपाई महेश सावंत, पोलीस हवालदार वसंत चौरे, पोलीस हवालदार कुंभारे, पोलीस हवालदार जयकर जाधव, महिला पोलीस हवालदार गोल्हे यांनी केली आहे.