राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्ष पदांचे आरक्षण जाहीर…

Published:

mumbai – राज्यातील ३४ जिल्हा परिषदांच्या अध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. पुणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी आहे, तर ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आले आहे. रायगड जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण, पालघर अनुसुचित जमातीसाठी राखीव तर नाशिकमध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून अध्यक्षाची निवड होणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकींच्या हलचालींना वेग आला आहे. ग्रामीण विकास विभागाकडून जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. त्यासोबतच पंचायत समिती सभापती आणि उपसभापती पदासाठीच्या आरक्षणाची अधिसूचना विभागाकडून काढण्यात आली आहे.

आरक्षण सोडत

ठाणे – सर्वसाधारण (महिला)
पालघर – अनुसुसूचित जमाती
रायगड- सर्वसाधारण
रत्नागिरी- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सिंधुदुर्ग – सर्वसाधारण
नाशिक – सर्वसाधारण
धुळे – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
नंदूरबार- अनुसूचित जमाती
जळगांव – सर्वसाधारण
अहिल्यानगर- अनुसूचित जमाती (महिला)
पुणे -सर्वसाधारण
सातारा- नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
सांगली – सर्वसाधारण (महिला)
सोलापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हापूर- सर्वसाधारण (महिला)
छत्रपती संभाजीनगर – सर्वसाधारण
जालना – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
बीड – अनुसूचित जाती (महिला)
हिंगोली – अनुसूचित जाती
नांदेड – नागरिकांचा मागास प्रवर्ग
धाराशिव – नागरिकांचा मागास प्रवर्ग (महिला)
लातूर – सर्वसाधारण (महिला)
अमरावती – सर्वसाधारण (महिला)
अकोला – अनुसूचित जमाती (महिला)
परभणी – अनुसूचित जाती
वाशिम – अनुसूचित जमाती (महिला)
बुलढाणा -सर्वसाधारण
यवतमाळ – सर्वसाधारण
नागपूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वर्धा – अनुसूचित जाती
भंडारा – नागरिकांचा मागास प्रवर्ग
गोंदिया – सर्वसाधारण (महिला)
चंद्रपूर – अनुसूचित जाती (महिला)
गडचिरोली – सर्वसाधारण (महिला)

Related articles

spot_img

Recent articles

You cannot copy content of this page